Pimpri News : प्रोजेक्ट मॉनिटरिंगसाठी ‘केपीएमजी’ची फेरनेमणूक; 92 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियान, माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ भारत अभियान (Pimpri News) यांसारख्या विविध योजनांच्या ‘प्रोजेक्ट मॉनिटरिंग अॅण्ड रिफॉर्म इम्प्लिमेंटेशन सपोर्ट’चे कामकाज करण्यासाठी पूर्वी कामकाज करणाऱ्या संस्थेचीच एक वर्षाकरिता नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेला 91 लाख 68 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण अभियान (जेएनएनयूआरएम), अमृत अभियान, माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण तसेच केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांच्या अनुषंगाने प्रोजेक्ट मॉनिटरिंग ॲण्ड रिफॉर्म इम्प्लिमेंटेशन सपोर्टचे कामकाज करण्यासाठी 2019 मध्ये केपीएमजी ॲडवायझरी सर्व्हिसेस यांची एक वर्षे कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली होती. या संस्थेच्या कामकाजाची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.

या प्रकल्पांकरिता आवश्यक उर्वरित निधी राज्य सरकार आणि महापालिका फंडातून उपलब्ध करून चालू प्रकल्पांचे कामकाज पूर्ण करण्यात येत आहे. हे सर्व कामकाज केपीएमजी ॲडवायझरी सर्व्हिसेस यांच्यामार्फत करण्यात येत आहे. सन 2020 मध्ये कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे निविदा प्रक्रियेद्वारे नव्याने संस्था नेमणूक करायचे कामकाज पूर्ण झाले नाही. केपीएमजी संस्थेचे कामकाज सुरू ठेवून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये केपीएमजी ॲडवायझरी सर्व्हिसेस (Pimpri News) यांचीच पुन्हा नेमणूक झाली.

Vadgaon Maval : धामणे गावच्या सरपंचपदी सारिका गरडे यांची बिनविरोध निवड

सन 2022-23 करिता पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातही केपीएमजी अँडवायझरी सर्व्हिसेस ही सल्लागार संस्थाच पात्र ठरली आहे. त्यांनी विविध कामकाजापोटी दिल्या जाणाऱ्या मासिक वेतनापोटीचे दरही सादर केले आहेत. त्यामध्ये एसबीएम को-ऑर्डिनेटरला 29 लाख 40 हजार रुपये, वॉश एक्स्पर्टला 32 लाख 88 हजार रुपये आणि माझी वसुंधरा को-ऑर्डिनेटरला 29 लाख 40 हजार रुपये असा एकूण 91 लाख 68 हजार रुपये खर्च दिला आहे. त्यानुसार विविध योजनांच्या अनुषंगाने प्रोजेक्ट मॉनिटरिंग अॅण्ड रिफॉर्म इम्प्लिमेंटेशन सपोर्टचे काम करण्यासाठी केपीएमजी अॅडवायझरी सर्व्हिसेसची एका वर्षासाठी नेमणूक होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.