Bhosari News : महाशिवरात्रीनिमित्त भोसरीत होणार ‘कीर्तन साधना’

एमपीसी न्यूज – महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव आयोजित केला (Bhosari News) आहे. या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन क्रीडांगणावर दि. 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत महाशिवरात्री सप्ताह आयोजित केला आहे.  सांकाळी 5 ते 6 पर्यंत हरिपाठ आणि रात्री 7  ते 9  कीर्तन सोळा रंगणार आहे.  यासाठी पठारे-लांडगे तालीम मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था, भोजेश्वर मित्र मंडळ, माळी-आळी मित्र मंडळ, संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय- तुकोबाराय प्रतिष्ठाण, नामस्मरण भजनी मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, श्री सावता माळी महाराज प्रतिष्ठान, समस्थ ग्रामस्थ भोसरी विधानसभा मतदार संघ यांनी पुढाकार घेतला आहे.

Pimpri News : प्रोजेक्ट मॉनिटरिंगसाठी ‘केपीएमजी’ची फेरनेमणूक; 92 लाखांचा खर्च

पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम महापौर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाशिवरात्री सप्ताह (Bhosari News) होणार आहे.  तसेच, या सप्ताहाच्या माध्यमातून ह.भ.प. गुरूवर्य भोसरीकर माऊली यांचे स्मरण करण्यात येणार आहे.

वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार कीर्तनाद्वारे मार्गदर्शन करणार आहे. भोसरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या महाशिवरात्री सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मान्यवरांची कीर्तनसेवा…
ह.भ.प. श्री श्रीमहंत पुरूषोत्तम महाराज पाटील, बापूसाहेब महाराज जावळीकर, शंकर महाराज शेवाळे, चंद्रकांत महाराज वांजळे, माऊली महाराज कदम, प्रमोद महाराज जगताप यांची कीर्तन सेवा ऐकायला मिळणार आहे. तसेच, महाशिवरात्रीला संजय महाराज पायगुडे आणि काल्याच्या कीर्तनात श्रीकांत महाराज गागरे सेवा करणार आहेत. काल्याचे कीर्तनामध्ये स्व. हिराबाई किसनराव लांडगे, स्व. ह.भ.प. रामचंद्र बाबूराव लांडगे आणि स्व. रमेश विठोबा लांडे यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब लांडगे आणि नंदकुमार लांडे (Bhosari News) अन्नदान करणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.