Vadgaon Maval : धामणे गावच्या सरपंचपदी सारिका गराडे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ तालुक्यातील धामणे (Vadgaon Maval) गावच्या सरपंच म्हणून सारिका विलास (नंदकुमार) गराडे यांची गुरुवारी(दि.9) बिनविरोध निवड झाली आहे.

सरपंच पदाच्या निवडणूक सभेमध्ये सारिका गराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी धामणे ग्रामपंचायत सर्व सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य विद्यमान पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी दीपक राक्षे व तलाठी भुतेकर यांनी पाहिले.

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडच्या कोयता गँगमधील तिघांना अटक, तर तिघे फरार

सारिका विलास गराडे या पिंपरी चिंचवड महापालिकेचे. निवृत्त शहर अभियंता (Vadgaon Maval) व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे काेषाध्यक्ष शांताराम गराडे यांच्या त्या सुनबाई आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.