Pimpri news: हाथरस प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा- अन्वर सय्यद

एमपीसी न्यूज – हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्र सरकारने उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती शासन लागू करावे. पीडित तरूणीवर मध्यरात्री अंतिम संस्कार करणारे पोलीस अधिकारी आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री यांची चौकशी करावी. आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट नेमावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे सचिव अन्वर सय्यद यांनी केली आहे.

याबाबत सय्यद यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राम राज्याचे दाखले देणारे, सुशांत सिंग राजपूत यावर आरडा ओरडा करणारे पत्रकार उत्तरप्रदेशातील घटनेवर वर गप्प का आहेत?.

हाथरसमध्ये घडलेले अनर्थ व त्यात पोलिसांनी व तेथील सरकारने केलेल्या बेजबाबदार कारवाईमुळे आज पूर्ण देशात संतप्त ज्वाला वाढू लागल्या आहेत. उत्तरप्रदेश मधील बेजबाबदार सरकार अजूनही आपल्या खुर्चीशी असे चिटकून बसलेले आहे.

एकीकडे पीडितेला न्याय मिळावा म्हणून संविधानिक मार्गाने कोरोनाच्या परिस्थितीमध्ये संचारबंदीचे पालन करीत डिस्टन्स मेन्टेन करीत दिवसात 10/10 संघटना निषेध मोर्चे काढीत आहेत.

हेच दृश्य देशभर दिसत असताना सुद्धा केंद्र सरकारला जनतेचा राग, तळमळ काशी वाटत नाही हाच प्रश्न पडतो, असेही सय्यद यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.