Pimpri News :  पिंपरीतील सलोनी बारवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई, मालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या पिंपरीतील सलोनी बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी बारचा मालक, वेटर आणि कुक यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याठिकाणी असलेल्या 46 ग्राहकांकडून 23 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.28) रात्री 12.30 वा ही कारवाई करण्यात आली. राजेश कनैय्या लालवानी (बार मालक, वय 48, रा. पिंपरी), अराफत मोजरिंम मंडल (वय 48, रा, पिंपरी), हबीबुल्ला माफीजुल शेख (वय 19) आणि कौसीक अनारूल मुल्ला (वय 21) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलोनी बार रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवण्यात आला होता. सामाजिक सुरक्षा विभागाने या ठिकाणी सापळा रचून बारवर कारवाई केली. या वेळी बारमध्ये असलेल्या 46 ग्राहकांकडून 23 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, 7 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल बारमधून जप्त करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.