Pimpri corona Update : शहरात आज 61 नवीन रुग्णांची नोंद, 34 जणांना डिस्चार्ज, 1 मृत्यू

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 61 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील पिंपरीतील 67 वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 452 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 653  जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1810 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 759  अशा 2569 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 580 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 641 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरात कोरोनाला लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 6536 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 593 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.