Pimpri News: आयुक्तांनी जाताजाता मर्जीतील अधिकाऱ्यांना आवडते विभाग बहाल केले

उपायुक्तांच्या कामकाजाचे केले फेरवाटप; लोणकर यांच्याकडे भांडार, चितळेंकडे दक्षता नियंत्रण तर इंगळेंकडे प्रशासन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बदली आदेशाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.12) उपायुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना त्यांचे आवडते विभाग दिले. उपायुक्त मनोज लोणकर यांच्याकडे मध्यवर्ती भांडार, मंगेश चितळे यांच्याकडे दक्षता व नियंत्रण, उद्यान आणि सुभाष इंगळे यांच्याकडे प्रशासन विभाग सोपविला आहे.

_MPC_DIR_MPU_II

श्रावण हर्डीकर यांची शुक्रवारी (दि.12) राज्य सरकारने पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकपदी बदली केली. आयुक्तांनी त्याच दिवशी मर्जीतील अधिकाऱ्यांना हवे असलेले विभाग दिले. विभाग बदलाचा तत्काळ आदेश देखील काढला.

आरोपांमुळे मध्यवर्ती भांडार विभागात कंटाळलेले मंगेश चितळे यांच्याकडे दक्षता व नियंत्रण आणि उद्यान विभागाची जबाबदारी दिली आहे. प्रशासन नको असलेल्या आणि मध्यवर्ती भांडार विभाग हवे असलेल्या मनोज लोणकर यांच्याकडे भांडार विभाग सोपविला आहे. उद्यान विभाग नकोसा झालेले सुभाष इंगळे यांच्याकडे प्रशासन विभागाची धुरा दिली आहे. आयुक्त हर्डीकर यांनी बदलीच्या दिवशी उपायुक्तांचा कामाकाजाचे फेरवाटप केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.