Pimpri News: शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे विचार मनामनामध्ये रुजवणार – सचिन भोसले

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेचे विचार, ध्येयधोरणे प्रत्येकांच्या मनामनात, घरोघरी पोचविण्यासाठी शहर शिवसेनेचे पदाधिकारी सज्ज झाले आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे विचार पोचविण्यात येणार आहेत. तीनही विधानसभा मतदार संघात हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे शहरप्रमुख सचिन भोसले यांनी सांगितले.

आकुर्डी येथील शिवसेना भवनमध्ये मंगळवारी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, शहरसंघटक रोमी संधू, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, शहर समन्वयक भाविक देशमुख, उपशहर प्रमुख तुषार नवले, अमोल निकम, पांडुरंग पाटील, हरेश नखाते, सोमनाथ गुजर, संतोष पवार, सुधाकर नलावडे, दिलीप भोंडवे, सचिन सानप, अनिल सोमवंशी शैलेश मोरे, आबा लांडगे, दादा नरळे, राहुल भोसले, ऋषिकेश जाधव, सचिन सानप, रवींद्र खिलारे उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील जनतेच्या हितासह लोककल्याणासाठी राबविलेल्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्याचे काम शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाचा विचार तळागाळात पोचविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 14 जुलै ते 17 जुलै पर्यंत पिंपरी विधानसभा मतदारसंघात, 18 ते 20 जुलै रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघात तर 21 ते 24 जुलै रोजी भोसरी मतदारसंघात हे अभियान राबविण्यात येणार आहे.

यामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी तिन्ही विधानसभा अध्यक्ष, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यांच्याकडून बूथ कमिटी बांधणी, पक्षवाढीच्या दुष्टीने चर्चा, विचारविनिमय करणार आहेत. पक्षाचा विचार घरोघरी पोचविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पक्ष संघटनवाढ, पक्षाची बुथ निहाय बांधणी करणार असल्याचे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.