Pimpri News: भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – दिवंगत माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, बाबू नायर, विजय फुगे, नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक शितल शिंदे, नगरसेविका माधवी राजापुरे, महिला आघाडी प्रदेश कोषाध्यक्ष शैला मोळक, शहर उपाध्यक्ष नंदू दाभाडे, प्रकाश जवळकर, समीर जवळकर, अजय पाताडे, शहर चिटणीस देवदत्त लांडे, राजेंद्र ढवळे, विनोद मालु, योगेश सोनवणे, दिव्यांग सेलचे अध्यक्ष शिवदास हांडे, माजी नगरसेवक बाळासाहेब भुंबे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, गुजराथी आघाडी अध्यक्ष मुकेश चुडासमा, शिक्षक आघाडीचे सरचिटणीस प्रा. सदाशिव कांबळे, मंडल अध्यक्ष,विनोद तापकीर, महादेव कवितके, महिला आघाडी मंडल सरचिटणीस कविता करदास, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी, मंडल सरचिटणीस नंदू भोगले, नितीन अमृतकर, मधुकर बच्चे, युवा मोर्चा शहर चिटणीस मुक्ता गोसावी, सतपाल गोयल, मनोज तोरडमल, सौरभ शिंदे, कोमल काळभोर, कार्यालय प्रमुख संजय परळीकर आदी उपस्थित होते.

भारतरत्न व माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय राजकारणाला आदर्शभूत राजकारणाचा वस्तुपाठ घालून दिला. अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व प्रत्येक भारतीयांना आदर्शस्थानी आहे. आदर्श राजकारणाचा वस्तुपाठ वाजपेयी यांनी घालून दिला. त्यांच्या कवितांमधून भारताच्या ओजस्वीतेचे दर्शन त्यांनी संपूर्ण जगाला घडवले. अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.