Pimpri News: शहरातील अनेक भागांत गढूळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा; उपमहापौर तुषार हिंगे यांची तक्रार

पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी बैठक

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच, कमी दाबाने पाणी येत आहेत. त्यामुळे शहरभरातून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहे. त्या तक्रारींचे तातडीने उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ व योग्य दाबाने पुरवठा व्हावा, अशी तक्रार उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली.

या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार येत्या मंगळवारी (दि.22) दुपारी चारला बैठक आयोजित केली आहे.

शहराला पाणी देणार्‍या पवना धरण 100 टक्के भरले आहे. अशी सकारात्मक परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवड शहराला अद्यापही दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. दोन दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील अनेक भागांत गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना जुलाब, उलट्या, पोटदुखीचे आजार होत आहेत. काही भागांत कमी दाबाने आणि अवेळी पाणीपुरवठा होत आहे. पुरेसा प्रमाणात पाणी न मिळाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

कोरोना संकट काळात नागरिकांना पुरेसे पाणी न मिळणे ही गंभीर बाब आहे. त्या संदर्भात पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने उपाययोजना करून नागरिकांना सुरळीतपणे स्वच्छ व योग्य दाबाने पाणी मिळावे, अशी अपेक्षा उपमहापौर तुषार हिंगे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.