Pimpri News: ‘ जल्लोषावर विरजण; आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना घेतले फैलावर

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची (Pimpri News) आचारसंहिता असतानाही सुमारे 1 कोटी रुपये खर्चाच्या कार्यक्रमासाठी केलेला आटापिटा, जनसंपर्क विभागाला अंधारात ठेवून प्रसिद्धीच्या केलेला गवगवा, नियोजन, समन्वयाचा अभाव या सर्वांमुळे चर्चेत आलेल्या ‘जल्लोष शिक्षणाच्या आनंदोत्सवार आयुक्तांनी विरजण टाकले.

या कार्यक्रमातील त्रुटींमुळे आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उपायुक्त संदिप खोत यांना ‘अॅटी चेंबर’मध्ये घेवून चांगलेच फैलावर घेतले, कानउघाडणी केली. त्यामुळे जल्लोषातही त्यांचे चेहरे पाहण्याजोगे झाले होते. या कानउघाडणीची चर्चा महापालिका वर्तुळात दिवसभर सुरु होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘जल्लोष शिक्षणाचा’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. 24 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान आनंदोत्सव (कार्निव्हल) चे आयोजन करण्यात आले आहे.

Alandi : इंद्रायणी सेवा फाऊंडेशन वर्धापन दिनानिमित्त दिलीप मोहिते पाटील यांना निवेदन

चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते संपन्न झाले.

महापालिकेचा जल्लोष शिक्षणाचा हा उपक्रम महत्वकांक्षी (Pimpri News) होता. त्यासाठी दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. त्याकरिता एका खासगी एजन्सीचीही नेमणूक केली.

यासाठी या एजन्सीला 1 कोटी रूपये मोजले. आयुक्त शेखर सिंह सात दिवस दुबई दौ-यावर गेले होते. त्यांच्या अनुउपस्थितीत अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांनीच या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले.

मात्र, हा कार्यक्रम घेण्यापूर्वी शिक्षक, संघटना, कर्मचारी यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे या कार्यक्रमाकडे शिक्षक संघटनांनी पाठ फिरवली.

शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रमाचा पुरता खेळखंडोबा झाला. नियोजनाचा अभाव, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना जेवण नाही, कोणालाच कोणाचा पायपोस नव्हता.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन सकाळी 10 वाजता असताना दुपारी 12 वाजता झाले. प्रसिद्धीसाठीही खासगी संस्थेची नियुक्ती केली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचलानासाठी रेडिओ जॉकीला आणले होते. सगळा सावळा गोंधळ होता.

दोन दिवसांच्या कार्यक्रमावर 1 कोटी रुपयांचा खर्च करूनही कार्यक्रमाची शोभा झाली.

महापालिकेचा कार्यक्रम असतानाही पालिकेच्या जनसंपर्क विभागाला कोणतीही कल्पना नव्हती. सुरक्षा विभागालाही माहिती देण्यात आली नाही. खासगी एजन्सीच्या माध्यमातून हा सर्व कार्यक्रम घेतला. नियोजन, समन्वयाच्या अभावामुळे कार्यक्रमाचे तीनतेरा झाले.

यामुळे संतापलेल्या आयुक्त शेखर सिंह यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदिप खोत यांना अॅटो क्लस्टर येथील अँटी चेंबरमध्ये बोलावून घेतले आणि चांगलीच कानउघाडणी केली.

त्यामुळे जल्लोषातही त्यांचे चेहरे पाहण्याजोगे झाले होते. या कानउघाडणीची चर्चा महापालिका वर्तुळात दिवसभर सुरु होती. कार्यक्रमानंतर आयुक्त शेखर सिंह पालिका मुख्यालयातही फिरकले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.