Pimpri News: महापालिकेच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेत  सुजित बाबर यांचा प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज –  स्वच्छ भारत / महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेत  (स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज) सुजित बाबर यांचा प्रथम तर शुभम चांदगुडे आणि टीम, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग,   मॅनेजमेंट  अँड रिसर्च आकुर्डी यांचा द्वितीय आणि – निरुपमा राजीवन व  जयवंत शिक्षण प्रसारक मंडळांच्या राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी ) धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी ) राबविण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला आहे.  स्वच्छ भारत / महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धा  (स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज) आयोजित करण्यात आली.

स्वच्छता मोहिमेमध्ये  जास्तीत जास्त नागरिकांनी  सहभागी व्हावे हा या स्पर्धेचा उददेश होता. त्याअनुषंगाने गठीत समितीने स्पर्धकांचे मुल्यमापन (कामकाज) करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.  गठीत समितीमध्ये आयुक्त राजेश पाटील, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के.  अनिल रॉय , मुख्य माहिती व  तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, अमोल देशपांडे यांचा समावेश होता.

प्रथम क्रमांक – सुजित बाबर, ट्रान्सफिगर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आला. त्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेत सरकारी कार्यालयांतर्गत चालणा-या सेवा, योजना, माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.   येथे त्यासाठी विजेत्यांनी Software application चा वापर केला आहे जेणेकरुन प्रत्येक नागरिकांपर्यत माहिती पाहचवणे शक्य आहे. तर, द्वितीय क्रमांक – शुभम चांदगुडे आणि टीम, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग,   मॅनेजमेंट  अँड रिसर्च आकुर्डी, पुणे. यांना देण्यात आला.  द वेस्ट गोल्ड माइन हा प्रोजेक्ट त्यांनी सादर केला आहे. यामध्ये आजच्या नावीन्य पुर्ण जगात कचरा व्यवस्थापन हा विषय दुर्लक्षित होत असल्याने आम्ही या प्रश्नानाकडे लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे. घरातून निघणारा घरगुती कचरा हा विविध प्रकारात बाहेर पडतो. परंतु, तो व्यवस्थित विलगीकरण होत नसल्यामुळे बरेच आजार वाढत आहे. आम्ही बनविलेल्या मशीनचा फायदा हा प्रत्येक नागरीकाला झाला पाहीजे. या दृष्टीकोनातून कमीत कमी दिवसामध्ये खत निर्मिती हा विषय आम्ही मांडला आहे. आर्थिक फायद्याच्या दृष्टीकोनातून परिसरातील प्रत्येक वर्ग म्हणजे तरूण वर्ग ते शेतकरी तसेच कमर्शिल सोसायटी या ठिकाणी  या संशोधनाचा नक्कीच फायदा होईल.

तिसरा क्रमांक – निरुपमा राजीवन व  जयवंत शिक्षण प्रसारक मंडळांच्या राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय ताथवडे येथील द्वितीय वर्ष संगणक  अभियांत्रिकी विभागातील ‍विद्यार्थी यांना देण्यात आला.  अविनाश देवस्थळी- प्राचार्य, डॉ. दीपक माने, व डॉ. प्रवीण घटे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. निरुपमा  राजीवन, संकेत सोनार,साहिल कंधारे, स्वस्ती राय, प्रथम घाटकर, शशांक भोसगी या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेवुन डीजीटल सोल्युशन टु चेक दी ओव्हल फलो ऑफ सेप्टीक टँक ऍन्ड सेव्हर लाईन्स हा प्रोजेक्ट सादर केला.

महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये मोलाचे योगदान सदर विजेत्याचे आहे असे गौरवोद्वार काढून या विजेत्यांचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.