Pimpri: चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा; चार लाख 77 हजार मतदार

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील 73 लाख 69 हजार 141 मतदार मतदान करतील. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत दोन लाख एक हजार 480 नवीन मतदारांची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वांत मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ ठरला असून चार लाख 77 हजार 40 मतदारांची संख्या आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.31) प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन नावे नोंदविण्याबरोबरच, पत्त्यात बदल, नावातील चुकीची दुरुस्ती आणि मयत मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे.

  • अशी आहे आकडेवारी
    जिल्ह्यात लोकसंख्येनुसार सर्वाधिक मोठा मतदारसंघ चिंचवड विधानसभा ठरला आहे. या मतदारसंघात चार लाख 77 हजार 40 मतदारांची संख्या आहे. तर, पिंपरी मतदारसंघात तीन लाख 41 हजार 626 मतदार संख्या आहे. तर, भोसरी मतदारसंघात तीन लाख 99 हजार 400 मतदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.