Pimpri : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररीत्या घरामध्ये प्रवेश करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेहरूनगर पिंपरी येथे घडली.

या प्रकरणी पीडित मुलीच्या 40 वर्षीय वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 17 वर्षीय मुलावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने पीडित मुलीच्या घरामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला. मुलीला किचनमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने आरोपीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता ‘तू आवाज केला तर बघ तुझं काही खरं नाही’ अशी मुलाने धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.