Chinchwad : सरकारी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी 127 जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी (दि. 29) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 127 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी खंड पडू दिलेला नाही. दररोज कारवाई केली जात आहे. आजवर सहा हजार पेक्षा अधिक जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तरीही नागरिक घराबाहेर पडतच आहेत.

बुधवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे भोसरी (2), पिंपरी (3), चिंचवड (14), निगडी (16), चाकण (3), दिघी (6), म्हाळुंगे चौकी (1), सांगवी (11), वाकड (21), हिंजवडी (24), देहूरोड (1), तळेगाव दाभाडे (1), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (20), रावेत चौकी (2) एकूण 127 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.