Pimpri : क्रिकेट बेटिंग प्रकरणी एकावर गुन्हा; 14 हजार रुपयांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज –  क्रिकेट बेटिंग प्रकरणी पिंपरी पोलिसांनी ( Pimpri ) कारवाई करत 14 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पिंपरी मार्केट येथे गुरुवारी (दि. 18) करण्यात आल्या.
याप्रकरणी पोलिसांनी अनिल घनशामदास रोहरा (वय 43 रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार विष्णू भारती यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आरोपी हा साऊथ आफ्रिका लीग 2024 प्रिटोरिया कॅपिटलस विरुद्ध डर्बन सुपर जायन्स या सामन्यावर बेकायदेशीर रित्या बोली लावून बेटिंग करत होता.
पिंपरी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून तेथून 12 हजार रुपयांचा मोबाईल व 2 हजार रोख जप्त केले. याप्रकरणी आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा व इंडीयन टेलिग्राम ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरी पोलिस याचा पुढील तपास करत ( Pimpri ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.