Pimpri : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विकास अकॅडमी तर्फे व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि विकास अकॅडमीच्या तिसऱ्या  वर्धापन दिनानिमित्त, विकास अकॅडमी तर्फे व्हाट्सअप व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून वय वर्ष 25 पर्यंत सर्वांना भाग घेता येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी 3 ते 4 मिनिटांचा स्वत:चा चेहरा दिसेल असा स्वतःच्या आवाजातील भाषणाचा व्हिडिओ तयार करून व्हाट्सअपद्वारे पाठवायचा आहे.

स्पर्धकानी मराठी, हिंदी व इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत, दिलेल्या कोणत्याही एका विषयावर भाषण केलेला व्हिडिओ व्हाट्सअपद्वारे पाठवायचा आहे. या स्पर्धेसाठी विविध बक्षीस ठेवण्यात आली असून प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये 1001 व पुस्तक संच देण्यात येणार आहे तर द्वितीय क्रमांकासाठी रुपये 501 व पुस्तक संच आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना पुस्तकसंच भेट देण्यात येणार आहे.

भाषणाचा व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख मंगळवार (दि.14) एप्रिल आहे. व्हिडिओ पाठवण्यासाठी व स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी विकास 9595552788 व नितीन 9307477938 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वक्तृत्व स्पर्धेसाठी खालील विषय देण्यात आले आहेत.

1) आधुनिकता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘आरबीआय’ स्थापना योगदान

3) समता दलाची स्थापना

4) डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला?

5) डॉ. बाबासाहेब व अस्पृश्यता

6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धम्म

7) संविधानातील तुमचे आवडते कलम

8) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे साहित्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.