Pimpri: ‘राजमुद्रा ग्रुप’ आणि ‘राजू मिसाळ मित्र परिवार’च्या वतीने YCMH ला ऑक्सिजन सिलेंडर भेट

Oxygen cylinder gift to YCMH on behalf of ‘Rajmudra Group’ and ‘Raju Misal Mitra Parivar’

एमपीसी न्यूज – कोरोनाविरोधातील लढाईसाठी राजमुद्रा ग्रुप’  आणि ‘राजू मिसाळ मित्र परिवार’ यांच्या वतीने पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 45 ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (शुक्रवारी)  आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात येणा-या जम्बो फॅसिलीटी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा वीस हजार पेक्षा जास्त असला तरी साडे सतरा हजारांहून जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आगामी काळात आणखी रुग्ण संख्या वाढण्याचा धोका विचारात घेऊन कै. आण्णासाहेब नगर स्टेडियम, ऑटो क्लस्टर व बालनगरी येथे जम्बो फॅसिलीटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार महापालिका काम करीत आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोविडसाठी समर्पित करण्यात आले आहे. या रुग्णालयास माजी उपमहापौर राजू मिसाळ यांनी 45 ऑक्सिजन सिलेंडर भेट दिले आहे.

तत्पुर्वी, ‘राजमुद्रा ग्रुप’  आणि ‘राजू मिसाळ मित्र परिवारच्या’  वतीने सकाळी दुर्गा देवी टेकडी येथे अत्यावश्यक सेवेसाठी ट्रॉली स्ट्रेचर व फोल्डींग स्ट्रेचर भेट देण्यात आली.

यावेळी  राजू मिसाळ, सुप्रभात मित्र परिवारचे अध्यक्ष अंकुश बंडगर, पक्षीमित्र चंद्रकांत देसाई, वृक्षमित्र बळवंत पडवळ, कृष्णा साळवी, सुनिल हेमाणे, निंबा चौधरी, रविंद्र मोहिते, बाबासाहेब नायकवडी, विनायक पेणकर, शेखर पुजारा, केरु राऊत, विलास कु-हाडे, ज्ञानेश्वर पाठक, अनिल आढाव, बापू मोहिते, नारायण बुरुमकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.