Pimpri : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

देहूच्या संत तुकाराम महाराज देवस्थानकडून मागील काही वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना पालखी प्रस्थान सोहळ्यास येण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे. खासदार बारणे यांच्या आ़ग्रहास्तव ठाकरे यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी देहूतून सोमवारी (दि. 24 जून) प्रस्थान ठेवणार आहे. देहू गावातील देऊळवाड्यातून पालखी प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यासह देशभरातून वैष्णवांचा मेळा देहूगावकडे येतो. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान होते. खासदार श्रीरंग बारणे स्वतः विठ्ठल भक्त आहेत. त्यांची विठ्ठल, संत तुकाराम महाराज आणि सर्व संतांवर अपार भक्ती आहे.

संत तुकाराम महाराज देवस्थानच्या वतीने मागील काही वर्षांपासून शिवसेवा प्रमुख उद्धव ठाकरे यांना पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात येत होते. मात्र, ठाकरे यांच्या कार्यव्यस्ततेमुळे ते प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. यावर्षी खासदार श्रीरंग बारणे यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहावे, यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.