Pimpri : पवना व इंद्रायणी नद्या उगमापासून स्वच्छ होणार; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पवना आणि इंद्रायणी नद्या अलीकडच्या काळात प्रदूषित झाल्या (Pimpri) आहेत. दोन्ही नद्या उगमापासून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत कामे केली जाणार आहेत. नदी सुधार प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे गेला आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर तत्काळ कामांना सुरुवात होईल. नद्यांमध्ये प्रदूषित पाणी जाऊ नये यासाठी इंद्रायणी व पवना नदी काठच्या सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी आमदार अश्विनी जगताप, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, महापालिका आणि पीएमआरडीएचे संबंधित अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.

पवना आणि इंद्रायणी नदी उगमापासून स्वच्छ करणे आणि प्रदूषण मुक्त करणे या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून काम सुरु आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. अमृत योजनेअंतर्गत याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत खासदार श्रीरंग बारणे सातत्याने केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा 577.16 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑगस्ट 2023 मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला. राज्याने यास मान्यता दिली असून आता हा अहवाल केंद्राच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे (एनआरसीडी) सादर (Pimpri) करण्यात आला आहे. एनआरसीडी कडून 60 टक्के अनुदान आणि राज्य शासन 40 टक्के अनुदान देणार आहे.

Chinchwad : खुनाच्या गुन्ह्यात आरोपीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी साक्षीदारावर दबाव

इंद्रायणी नदीच्या तीरावर एकूण 48 गावांमधील पाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्याबाबत नियोजन केले जात आहे. यामध्ये लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी नगरपरिषदा, वडगाव, देहू नगरपंचायती, देहू कटक मंडळ, 15 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या तीन ग्रामपंचायती आणि इतर 39 ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे. पवना नदीच्या किनारी देखील ज्या ग्रामपंचायतींचे पाणी पवना नदीत मिसळत आहे, तिथे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत.याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन वर्षात या दोन्ही नद्या शंभर टक्के प्रदूषणमुक्त होतील. वारकऱ्यांचे शुद्ध इंद्रायणीचे स्वप्न निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीरंग बारणे पुढे म्हणाले, ज्या नगरपालिकांचे आणि गावांचे पाणी नदीत मिसळत आहे त्या गावांमध्ये पूर्ण क्षमतेने एसटीपी उभारण्यात येणार आहेत. यामुळे नदीन मिसळणारे सांडपाणी प्रक्रिया होऊनच नदीत सोडले जाईल. याचा राज्य शासनाकडून केंद्राकडे प्रस्ताव गेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या सहकार्याने पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.

इथे उभारणार एसटीपी प्लांट –

इंद्रायणी नदीच्या काठावर लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, देहू नगरपंचायत, वडगाव नगरपंचायत, देहू कटक मंडळ, कुसगाव बुद्रुक, कामशेत-खडकाळे, इंदुरी ही 15 हजार पेक्षा अधिक लोकसंख्येची गावे, कार्ला, वरसोली, कान्हेवाडी तर्फे चाकण, येलवडी, आंबी, जांभूळ, कान्हे, गोळेगाव, सोळू, तुळापुर, मरकळ, नाणे, टाकवे बुद्रुक, सांगुर्डी, वडगाव शिंदे या 15 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांत एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत. उर्वरित 24 गावांमध्ये इन सेतू नाला ट्रीटमेंटचा वापर करून मैला शुद्धीकरण करण्याचे काम केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.