Pimpri : हद्दीबाहेरील कचरा शहरात टाकणा-यांवर फौजदारी कारवाई

महापालिकेच्या आरोग्य विभागाचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांमधून शहराच्या हद्दीत घनकचरा, हॉटेल वेस्ट टाकले जात आहे. त्याला आळा घालण्याकरिता महापालिकेमार्फत फिरती पथक तैनात करण्यात आले आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कचरा टाकणा-यांवर दंडात्मक, फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या गावांमधून त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्पन्न होणारा घनकचरा, हॉटेल वेस्ट महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये टाकण्यात येत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेमार्फत फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकामार्फत महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये बाहेरुन येणारा कचरा टाकणा-या व्यावसायिकांवर, नागरिकांवर दंडात्मक, फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील प्रस्तावीत करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या कार्यक्षेत्रामध्ये बाहेरुन येणारा कचरा टाकल्याने आढळून आल्यास नागरिकांनी फोटोसहित माहिती महापालिकेला द्यावी. कचरा टाकण्या-याचा फोटो 9922501872 या क्रमाकांवर व्हॉट््सअपद्वारे पाठविण्याचे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.