Pimpri : खुनाच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. ही कारवाई तळेगाव जवळ कान्हे फाटा येथे मंगळवारी (दि. 30) करण्यात आली.

चैतन्य उर्फ चेतन रंगनाथ येवले (वय 31, रा. कान्हेवाडी कमानी जवळ, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेला एक आरोपी मागील तीन वर्षांपासून फरार आहे. तो आरोपी मंगळवारी कान्हे फाटा येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चैतन्य याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो चाकण पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार आरोपी असल्याचे आढळून आले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस हवालदार धनराज किरनाळे, दादा पवार, पोलीस नाईक राजेंद्र बारशिंगे, मोहम्मदगौस नदाफ, किरण खेडकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.