Nigdi Crime : कार चोरी करणाऱ्याला थेट राजस्थानमधून अटक

एमपीसी न्यूज : प्राधिकरण निगडी परिसरातून (Nigdi Crime) एकाच दिवशी दोन कार चोरी करणाऱ्या आरोपीस राजस्थान येथून अटक करून त्याच्याकडून 20 लाख रुपयांच्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट 1 ने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

याबाबत हेमंत भोसले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सेक्टर नंबर 27, शरद हाऊसिंग सोसायटी, प्राधिकरण निगडी येथे 5 डिसेंबर रोजी हेमंत भोसले यांची ह्युंदाई आय ट्वेन्टी कार तसेच नितीन पवार यांची ह्युंदाई क्रेटा अशा दोन कार रात्रीच्या वेळी सोसायटीमध्ये पार्क केल्या होत्या. त्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.

याप्रकरणी रमेश प्रभुराम बिष्णोई (वय 24 वर्ष, रा. सियागाव, ता. सांचौर, जि. राजस्थान) याला अटक करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एक हे पोलीस पथक करत असताना गुन्ह्याच्या ठिकाणी तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना या दोन्ही कार या नाशिक रोडने गेल्या असल्याचे दिसून आले. तपास पथकाने नाशिक हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज येवलापर्यंत चेक केले असता, त्यांना त्या दोन्ही कारच्या नंबर प्लेट बदली करून राजस्थानच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्यासोबत असणाऱ्या आय टेन या तिसऱ्या गाडीचा नंबर मिळाला. त्या नंबरवरून मालकाचे नाव-पत्ता मिळवून त्याबाबत तपास केला असता गाडी मालकाचा मोबाईल या घटनेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ठाणे शहर हद्दीत आढळून आला.

त्याच फोनचे लोकेशन हे दुसऱ्या दिवशी येवला येथे आढळून आले. याबाबतची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार बाळू कोकाटे, महादेव जावळे, फारुख मुल्ला, सोमनाथ बोऱ्हाडे, प्रमोद हिरळकर यांचे पथक सांचौर येथे पाठवण्यात आले. त्या पथकाने तिथे जाऊन सलग चार दिवस राहून आरोपीची माहिती मिळवली. यावरून पोलिसांना समजले, कि आरोपी रमेश बिष्णोई हा स्थानिक पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच त्याच्या साथीदार अफीम तस्करीमध्ये फरार आरोपी आहे.

तपास पथकाने आरोपी बिष्णोई याला राजस्थान येथील (Nigdi Crime) मार्केटमधून मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याचे इतर साथीदार पळून गेले. आरोपी बिष्णोईची सखोल चौकशी केला असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून दोन्ही गाड्या ताब्यात घेण्यात आल्या असून त्याला अटक करण्यात आले आहे.

Pune News : लष्कराच्या वतीने तेहतीस शहरांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.