Dehuroad : देहूरोड बुद्ध विहार येथील कार्यक्रमांमुळे 25 डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी (Dehuroad) रंगोली येथून गौतम बुद्धांची मूर्ती आणून ती देहू रोड येथील बुद्ध विहार येथे स्थापन केली होती. या घटनेला 68 वर्ष झाली. त्यानिमित्ताने 68 वा वर्धापन दिन 25 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातून व राज्यातून लाखो बौद्ध अनुयायी येतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने 25 डिसेंबर रोजी तात्पुरते बदल केलेले आहेत.

देहूरोड/ निगडी वाहतूक विभाग अंतर्गत –  Dehuroad
1) जुना मुंबई पुणे हायवे सोमाटणे वरून निगडी (पुणे) कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सेंट्रल चौकातून पुढे जाण्यास मनाई केली आहे.
पर्यायी मार्ग – सेंट्रल चौकातून उजवीकडे वळून मुंबई बेंगलोर हायवे मार्गे इच्छित स्थळी जातील.

2) पिंपरीकडून देहू रोड मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक भक्ती शक्ती चौकातून पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग – पिंपरी कडून देहू रोड मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व वाहने भक्ती शक्ती चौकातून डावीकडे वळून रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील.

वरील प्रमाणे देहूरोड निगडी वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सकाळी 4 ते मध्यरात्रीपर्यंत (रात्री 12 ) हे वाहतुकीत बदल लागू असतील.

Nigdi Crime : कार चोरी करणाऱ्याला थेट राजस्थानमधून अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.