Pimpri: मास्क खरेदी, जेवण पुरवठ्यामध्ये गैरप्रकार करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका; खासदार बारणेंची आयुक्तांना सूचना  

Pimpri: Blacklisting contractors who misappropriate masks, food supplies; MP Barne's notice to the Commissioner :ठेकेदारांकडून 'टाळूवरचे लोणी खाण्याचा' प्रकार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या महामारीत  ठेकेदार ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ प्रकार करत आहेत. मास्क खरेदी, जेवण पुरवठ्यामध्ये गैरव्यहार, गैरप्रकार करणा-या संस्था, ठेकेदारांना तत्काळ काळ्यात यादीत टाकावे, अशी स्पष्ट सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

खासदार बारणे यांनी आज (सोमवारी) शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला विविध सूचना केल्या. तसेच पालिकेने पुरविलेले मास्त निकृष्टदर्जाचे असल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. भांडार विभागाने काही संस्थांचे मास्क  चौकशी समितीला दिले नव्हते.

खासदार बारणे म्हणाले, ”पालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा दर्जा चांगला नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. सुविधांचाही अभाव आहे. त्याकडे जातीने लक्ष घालावे. त्याठिकाणच्या तक्रारी येवू देवू नयेत. याची खबरदारी घ्यावी.

कोविडच्या या प्रक्रियेत ठेकेदार ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ प्रकार करतात. मास्क खरेदी, जेवण पुरवठ्यामध्ये गैरव्यहार, गैरप्रकार करणा-या संस्था, ठेकेदारांना तत्काळ काळ्यात यादीत टाकावे”, असे बारणे यांनी आयुक्तांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.