Pune : शहरात सहा दिवसात 11 हजार 577 रुग्ण वाढले

The city grew to 11,577 patients in six days:245 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सध्या 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमधील दि. 14 ते 19 जुलै या 6 दिवसांत तब्बल 11 हजार 577 कोरोनाचे रुग्ण वाढले. तर, 245 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. रोज 7 हजारांच्या आसपास चाचण्या होत असल्याने 1500 ते 2 हजार रुग्ण वाढतेच आहेत. लॉकडाऊनच्या आधी 800 ते 1 हजार रुग्ण वाढत होते.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

सुरुवातीला 5 दिवस कडक लॉकडाऊन होता. रविवारपासून हा लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट न होता वाढ होत असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील 24  तासांत पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात तब्बल दोन हजार 459 रुग्णांची नोंद झाली तर 61  रुग्णांचा मृत्यू झाला.

एका दिवसांतील पुण्यातील करोना बाधितांच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. ही संख्या मुंबईपेक्षाही जास्त आहे. पुणे आता रुग्णवाढीत पुढे गेले आहे. दि. 7  जूलै ते 12  जुलै या दरम्यान पुण्यात 8 हजार 658  रुग्णांची वाढ झाली होती.

मागील काही दिवसांत पुण्यात चाचण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळेच पुण्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोरोनाचे पुणे शहरात 37 हजार 386 रुग्ण झाले आहेत. 22 हजार 611 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाचे शहरात 13 हजार 799 रुग्ण आहेत. 976 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त लठ्ठपणा, मधुमेह, किडनी, हृदय विकार, असे अनेक आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.