Pimpri : पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने पटकाविले विजेतेपद

एमपीसी न्यूज – आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत पीसीसीओई संघ विजयी झाला (Pimpri) असून संकर्ष शेळकेचा आठ फेऱ्या जिंकून प्रथम क्रमांक आला आहे.

पिंपरी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pimpri)आणि सिंहगड अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग, कोंढवा यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबर महिन्यात आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ (मुले व मुली) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Kasarwadi : रेल्वे पुलाखाली पाण्यात अडकली कार

या स्पर्धेत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) मुलांच्या संघाने सलग नव्यांदा विजेतेपद पटकाविले. एकूण25.5 गुण मिळवून पीसीसीओई संघ अव्वल स्थानी राहिला. स्पर्धेमध्ये एकूण 56 महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता.

डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी संघ एकूण 24.4 गुणासह (Pimpri ) द्वितीय क्रमांक मिळविला.

तसेच वैयक्तिक प्रकारामध्ये एकूण 236  स्पर्धकांमधून पीसीसीओई, निगडी संघातील खेळाडू संकर्ष शेळके याने स्पर्धेतील सर्व आठ फेऱ्या जिंकून प्रथम क्रमांक मिळविला.

विजयी पीसीसीओई संघातील खेळाडू संकर्ष शेळके, सर्वेश सावंत, ऋषिकेश शिंदे, पुष्कर वाळवेकर आणि महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.