Kasarwadi : रेल्वे पुलाखाली पाण्यात अडकली कार

एमपीसी न्यूज – रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात एक कार (Kasarwadi) अडकली. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी शंकरवाडी, कासारवाडी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे(Kasarwadi )सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नाशिक फाटा येथील शंकरवाडी येथे असलेल्या रेल्वे पुलाच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाणी साचलेले असताना एक कार चालक या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करीत होता.

Pune : मोठी बातमी! ससून रुग्णालयात उपचाराच्या बहाण्याने दाखल होत चालवत होता ड्रग्ज रॅकेट; पोलिसांनी उधळला डाव

दरम्यान, कार पुलाखाली जाताच कार बंद पडली. पाण्याच्या (Kasarwadi) मधोमध कार बंद पडल्याची माहिती मिळतच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी कार मधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.