Kasarwadi : मेट्रो स्थानकासमोर उभारणार ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय

एमपीसी न्यूज  – कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआय इमारतीमध्ये (Kasarwadi) असलेले ह क्षेत्रीय कार्यालय संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनसमोरील बांधण्यात येणार आहे. या सुधारित प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

ह क्षेत्रीय कार्यालय कासारवाडीतील शंकरवाडी येथील एका हॉटेलशेजारी आयटूआर अंतर्गत मिळालेल्या जागेवर बांधण्यात येणार होते. नाशिक फाटा चौकाजवळ ही इमारत बांधली जाणार असल्याने नागरिकांना तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोईस्कर ठरणार होती. त्यास आयुक्तांनी 18 ऑक्‍टोबर 2022 ला मान्यता दिली होती.

Chinchwad : दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी रेल्वेचे वेटिंग अन बस स्थानकावर गर्दी

नगररचना विभागाकडे संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनसमोरील आयसीसी देवी टॉवरची जागा आयटूआर (Kasarwadi) अंतर्गत ताब्यात आली आहे. ही जागा आयताकृती असून, पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सोयीची ठरणार आहे. या जागा बदलास आयुक्तांनी 27 ऑगस्ट 2023ला मान्यता दिली आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात नव्या लेखाशिर्षासह 35 कोटीची तरतूद करण्यास आयुक्त सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.