Dehuroad : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – घरगुती गॅसचा काळाबाजार (Dehuroad) केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर यातील दोघांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई देहुरोड पोलिसांनी रविवारी (दि.5) देहुरोड येथील विकास नगर परिसरात केली आहे.

पोलिसांनी विजय भाऊसाहेब कोकरे (वय 28, रा.देहुरोड) व अनिल बबन गडाळे (वय 24, रा. देहुरोड) यांना अटक केली आहे. तर शशिकांत संजय मिटकरी (वय 23, रा.देहुरोड) व प्रशांत अशोक कारंडे (वय 19, रा. देहुरोड) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chinchwad : दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी रेल्वेचे वेटिंग अन बस स्थानकावर गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदेशीर रित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोण्यात्या ही सुरक्षितते शिवाय (Dehuroad) भरलेल्या सिलेंडर मधील गॅस रिकाम्या गॅसमध्ये भरत होते.

यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हे बेकायदेशीर कृत्य करत असल्याने देहुरोड पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.