PCMC : एक तास स्वच्छता मोहिमेत 40 हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या जयंती पुर्वी देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’(PCMC )अभियानांतर्गत श्रमदान केले जात आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने आज सकाळी 10 ते 11 या वेळेत ‘एक तास स्वच्छतेसाठी’ उपक्रम राबविण्यात आला.

शहराला कचरामुक्त करून स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकामध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात एक तास स्वच्छता मोहिमेत 40 हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी सहभागींना स्वच्छतेबाबत शपथ देण्यात आली.

 

Mahalunge : राऊंड ग्लास अकादमीचा 27 गोलने दणदणीत विजय

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता हीच सेवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत संपूर्ण शहरात (PCMC) राबविण्यात आलेल्या ‘एक तास स्वच्छतेसाठी’ या स्वच्छता मोहिमेची सुरुवात अ क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने पिंपरी येथील शगुन चौकातून स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली.

आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार उमा खापरे त्याचप्रमाणे (PCMC )माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, माजी नगरसदस्य संदीप वाघेरे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, निकिता कदम, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, विद्यार्थी, मंडळे, गृहनिर्माण संस्था व स्थानिक नागरिकांनी शपथ घेतली आणि पिंपरी चौक व परिसरात स्वच्छता केली.

तसेच अ क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने इतर ठिकाणी झालेल्या स्वच्छता मोहिमेस माजी महापौर मंगला कदम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक केशव घोळवे, सुनील कदम, माजी नगरसेविका मीनल यादव, शर्मिला बाबर उपस्थित होते .

ब क्षेत्रीय कार्यालय येथे स्वच्छता मोहिमेत माजी नगरसदस्य नामदेव ढाके, राजेंद्र साळुंखे, राजाभाऊ गोलांडे, ॲड. मोरेश्वर शेडगे, गोविंद पानसरे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, बिभीषण चौधरी तर नगरसदस्या संगिता भोंडवे, आश्विनी चिंचवडे, ज्योती भारती, उमा काळे क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित कार्यकारी अभियंता जहीरा मोमीन आदी उपस्थित होत्या.

क क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने गाव जत्रा मैदान भोसरी येथे आमदार महेश दादा लांडगे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके, माजी नगरसेवक संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, सागर गवळी, विलास मडिगेरी, माजी नगरसेविका सोनाली गव्हाणे, निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे, सारीका लांडगे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, सुनील बागवानी, अविरत श्रमदान संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश लोंढे ,संदीप बेलसरे, टाटा मोटर्स कंपनीचे कर्नल संजय कर्णिक व त्यांचे २०० स्वयंसेवक यांच्यासह नागरिक मोठ्या संखेने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

ड क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने स्वच्छता मोहिमेत आमदार अश्विनी जगताप, अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, माजी नगरसेवक शंकर जगताप, अंबरनाथ कांबळे, शत्रुघ्न काटे, विठ्ठल उर्फ नाना काटे, विनायक गायकवाड, राजेंद्र जगताप, शशिकांत कदम, सागर आंघोळकर, माजी नगरसेविका उषा मुंढे, आरती चोंधे, निर्मला कुटे क्षेत्रीय अधिकारी किरण मोरे उपस्थित होते.

इ क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने बैलगाडा मैदान भोसरी येथे आमदार महेश लांडगे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसेवक अँड. नितिन लांडगे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, सागर गवळी, विकास डोळस, हिराबाई उर्फ नानी घुले, माजी नगरसेविका सोनाली गव्हाणे, निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, सुनील बागवानी, अविरत श्रमदान संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश लोंढे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

फ क्षेत्रिय कार्यालयाच्या माजी नगरसेवक एकनाथ पवार, शांताराम भालेकर, संजय नेवाळे, सचिन चिखले, प्रा.उत्तम केंदळे, पंकज भालेकर, प्रविण भालेकर, बापू घोलप, धनंजय भालेकर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, संगीता ताम्हाणे, योगिता नागरगोजे, उपायुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप उपस्थित होते .

ग क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने स्वच्छता मोहिमेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, माजी नगरसेविका विमल जगताप, मनिषा पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, कार्यकारी अभियंता अकबर शेख, सहाय्यक आरोग्य अधिकारी अविनाश दरवडे, सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत बारणे, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक विद्यार्थी, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, मराठवाडा मित्र मंडळाच्या औषधशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच विविध शाळांतील विद्यार्थी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झालेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये माजी नगरसेवक शंकर जगताप, अंबरनाथ कांबळे, शाम लांडे, सागर आंघोळकर, महेश जगताप, तर नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, आशा धायगुडे शेंडगे, ‘सुजाता पालांडे, शारदा सोनवणे उपस्थित होत्या.

या उपक्रमात लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक, महिला बचतगट, स्वच्छतादूत तसेच अधिकारी, कर्मचारी, अशासकीय व शासकीय संस्था, औद्योगिक कंपन्या, रिक्षा संघटना, टपरी, पथारी हातगाडी संघटना, फेरीवाले, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, पर्यावरण प्रेमी, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आदींनी सक्रीय सहभाग नोंदविला आणि शहर स्वच्छतेचा संदेश दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.