Today’s Horoscope 02 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 02 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार.

02.10.2023.

शुभाशुभ विचार- क्षयतिथि. 

आज विशेष- संकष्ट चतुर्थी. (चंद्रोदय 20.35)

राहू काळ – सकाळी 7.30  ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – भरणी 18.24 पर्यंत नंतर कृत्तिका.

चंद्र राशी – मेष.

————————————

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

आज तुम्ही आपलेच खरे कराल. इतरांची मते तुम्हाला पटणार नाहीत. व्यवसायात भागीदारांमध्ये काही बाबतीत मतभेद संभवतात. सुसंवादाने योग्य निर्णय घेता येतील.

वृषभ (शुभ रंग- निळा )

मोठे आर्थिक व्यवहार उद्यावर ढकलले तर बरे होईल. जास्त लाभाच्या अपेक्षेने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका. व्यवसायात अनुभवींचे सल्ले उपयुक्त ठरतील.

मिथुन ( शुभ रंग- तांबडा )

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून तुमचे मनोबल आज उत्तम असेल. आप्तेसोकियात तुमच्या शब्दास मान असून कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आज तुमच्यावर खुश असतील. तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कामे पूर्ण करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील.

सिंह (शुभ रंग- हिरवा )

नोकरी व्यवसायात आज तुम्हाला काही आव्हानात्मक पेचप्रसंग सोडवावे लागतील. घरात थोरांशी मतभेद होतील. आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

कन्या ( शुभ रंग- मोरपंखी)

आज कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका. महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचारांती घ्या. घरात जोडीदाराची मते विचारात घ्यायला हवीत. मोठ्या रकमेचे व्यवहार आज जपूनच करा.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी )

आज कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्याची भावना राहील. धंद्यात महत्त्वाचे निर्णय घेताना भागीदारांमध्ये एकमत असेल. इतरांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्थी कराल.

वृश्चिक (शुभ रंग- आकाशी)

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नाही. ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम घ्यायची तुमची तयारी असेल. आज मात्र थोडे विश्रांतीस ही प्राधान्य द्यायला हवे. काही येणी असतील तर वसूल होतील.

धनु- (शुभ रंग- जांभळा )

आज तरुणांमध्ये चैनी व विलासी वृत्ती बळावेल. अनावश्यक खर्चाचे विविध मार्ग सुचतील. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळी आज आलेल्या संधीचे सोने करतील.

मकर ( शुभ रंग- सोनेरी )

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. तुमच्या मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. परिवारातील वातावरण खेळीमेळीचे राहील. प्रेम प्रकरणां पासून दूरच राहावे.

कुंभ (शुभ रंग – डाळिंबी)

आज कार्यक्षेत्रात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. काही मित्रही चुकीचा मार्ग दाखवतील. आज घराबाहेर वावरताना वाणीत गोडवा असू द्या. रागावर ताबा गरजेचा.

मीन -(शुभ रंग – राखाडी)

नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. आवक मनासारखी असली तरीही बचतीस मात्र प्राधान्य द्या. नाती जपण्यासाठी शब्द जपून वापरा.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.