Chikhali : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – विजेच्या तारेचा धक्‍का लागून (Chikhali) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 1) सकाळी चिखलीतील कुदळवाडी परिसरात घडली.

मोहम्मद असीम चौधरी (वय 23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Today’s Horoscope 02 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री झालेल्या (Chikhali) जोरदार पावसात सेक्‍टर 16 ते चिखली मार्गावरील विद्युत खांबावरील कनेक्‍टर सिल्प होऊन तार खाली आली. त्यात विद्युत प्रवाह सुरू होता.

ही तार तरुणाला न दिसल्याने तिला स्पर्श होऊन तरुण जागीच कोसळला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस प्रशासनाने संबंधित घटनेची माहिती महावितरणला देऊन वीजपुरवठा खंडित केला.

तरुणाला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाल्याचे (Chikhali) डॉक्‍टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.