BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी चिंचवडच्या गिर्यारोहकांनी सर केला ‘अन्नपूर्णा सर्किट’

एमपीसी न्यूज- ट्रेकिंगमध्ये मानाचा समजला जाणारा, तसेच जगातील लांब पल्ल्यांपैकी एक असे मतदान झालेला नेपाळमधील ‘अन्नपूर्णा सर्किट’ हा 5416 मीटर उंचीचे शिखर पिंपरी-चिंचवडमधील चार गिर्यारोहकांनी नुकतेच सर केला.

प्रशांत जोशी, अप्पा बेळगावकर, प्रसाद गुधाटे व ऋषिकेश बेळगावकर असंगी या चौघांची नावे आहेत. हा जवळपास 160 किमी अंतराचा 17 दिवसांचा एव्हरेस्ट बेस कॅम्पपेक्षाही कमी उंचीचा आहे. 720 मीटरपासून सुरू झालेल्या ट्रेकमध्ये या चौघांनी 5416 मीटर ही सर्वाधिक उंची गाठली.

(5416 मीटर) हा ट्रेक पिंपरी-चिंचवड मधील 4 व्यक्तींनी पूर्ण केला आहे ( प्रशांत जोशी, अप्पा बेळगावकर, प्रसाद गुधाटे, आणि ऋषीकेश बेळगावकर ). जवळपास 160 km चा 17 दिवसांचा ट्रेक एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षा ही उंच आहे. 720 मीटर पासून सुरू झालेल्या ट्रेक मध्ये त्यांनी 5416 मीटर ही सर्वाधिक उंची गाठली.

बेसिसहर ह्या गावातून सुरू झालेल्या ट्रेकमध्ये माश्यांगडी आणि काली गंडकी सारख्या दोन रिव्हर व्हॅली क्रॉस कराव्या लागतात. दाट जंगलांमधून ते लँडस्लाइड्ची भीती पत्करून भव्य आणि ओसाड कडे पार करत त्यांनी हा ट्रेक अतिशय चित्तथरारक अनुभवातून पूर्ण केला. अन्नपूर्णा 1 ते 4, धौलगिरी, मच्छपुच्छरे, मनस्ल्यू, गंगपूर्णा, तिलिच्यो, पिसांग या सारख्या पर्वतरांगांची साथ आणि रात्रीच्यावेळी सोळा हजार फुटांवरून झालेले आकाशगंगेचे दर्शन फक्त आणि फक्त नशीबवंतालाच अनुभवायला मिळते असे त्यांनी सांगितले. तसेच मानांग आणि लोअर मुस्तांग सारख्या भागातील तिबेटीयन राहणीमानाचे ही दर्शन घडले. सर्वात महत्वाचे म्हणजे तिथून परत येताना फक्त निसर्गाच्या आठवणी नाही तर सोळा ते अठरा हजार फुटांवर त्या गावातील राहणाऱ्या व्यक्तींची स्फूर्ती आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात विचार करण्यास भाग पाडते.

Advertisement