Pimpri : प्रेम स्वीकारण्यासाठी वारंवार मेसेज पाठवणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – प्रेमाचा स्वीकार करावा म्हणून तरुणीला वारंवार मेसेज पाठविणाऱ्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेसेज पाठविल्याचा जाब विचारण्याठी गेलेल्या फिर्यादीच्या आईलाही आरोपीने अरेरावी केली. ही घटना पिंपरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

रेहान लट्टा खान (वय 23, रा. आशीर्वाद सोसायटी, संत तुकाराम नगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेहान हा फिर्यादी तरुणीने आपल्या प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा म्हणून वारंवार तिच्या मागे लागला होता. या प्रस्तावाला तरुणीने नकार दिल्याने आरोपी तिला वारंवार मेसेज करीत होता. याबाबतचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी तरुणीच्या आईने शनिवारी (दि. 14) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरासमोर आलेल्या आरोपीला जाब विचारला. यामुळे संतापलेला आरोपी आरडाओरडा करीत फिर्यादी यांच्या आईच्या अंगावर धावून आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.