Dighi : गॅलरीचा दरवाजा उचकटून चोरी

एमपीसी न्यूज – गॅलरीचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरातील 11 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) पहाटे दिघी येथे घडली.

अंजली अलगौडा पाटील (वय 26, रा. परांडे होम्स, जकातनाका, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी पाटील यांच्या घराचा दरवाजा आतील बाजून बंद होता. त्यावेळी चोरट्यांनी गॅलरीचा दरवाजा कशाच्यातरी सहाय्याने उचकटून आतील दहा हजारांचा मोबाईल व रोख एक हजार 800 रुपये असा एकूण 11 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.