Pimpri : अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणात आज (शनिवारी) ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. तर, मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणीसाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देखील शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. शहराच्या विविध भागात रुटमार्च काढण्यात आला.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी रुट मार्चमध्ये सहभागी झाले होते. सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरले होते. महत्त्वाच्या चौकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.