Pimpri: मताचा टक्का वाढविण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पथनाट्याद्वारे मतदार जागृती करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात पथनाट्याचे सादरीकरण करत मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्याच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जाते. 
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगातर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे देखील पथनाट्याद्वारे मतदार जागृती करण्यात येत आहे. महापालिकेने जनजागृतीपर पथनाट्य आणि चित्ररथ तयार केला आहे. शहराच्या विविध भागात पथनाट्याचे सादरीकरण करत मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्याच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जाते. विविध ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

  • दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृती अभियानांतर्गंत मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात मतदान जनजागृतीपर पथनाटयाचे व चित्ररथाचे मतदार नोंदणी अधिकारी प्रवीण आष्टीकर व तहसिलदार दिपक वजाळे यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.