Chakan : गतिमंद तरुणीवर बलात्कार; बाळंतपणात गर्भवती पिडीतेसहित अर्भकाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज-  खेड तालुक्यातील पाईट येथील एका तेवीस मुलीवर गतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना संबंधित गर्भवती गतिमंद तरुणीचा बाळंतपणा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर उघडकीस आली आहे.  आदिवासी ठकार समाजातील युवतीवर झालेल्या अन्यायकारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिडीतेच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर चाकण पोलिसांनी हे कृत्य कोणी केले याचा शोध सुरु केला असून हा घृणास्पद प्रकारात नेमका कुणाचा किंवा किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

  • या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, खेड तालुक्यातील पाईट भागातील एका आदिवासी ठाकर वस्तीवरील तेवीस वर्षीय तरुणी गतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने ती ९ महिन्यांची गर्भवती राहिली. तिला राहत्या घरी त्रास होऊ लागल्याने औषध उपचारासाठी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
२३ मार्च २०१९ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास तिने एका मृत स्त्री अर्भकास जन्म दिला. त्यानंतर पिडीत गतिमंद तरुणीवर औषध उपचार सुरु असताना ६ एप्रिल २०१९ रोजी दुपारी तीनचे सुमारास तिचाही मृत्यू झाला. चाकण पोलिसांनी या प्रकरणी पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञातावर भा.दं.वि. कलम ३७६ (ल) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
  • दरम्यान, या अन्यायकारक प्रकाराबाबत ठाकर समाजातील या गरीब कुटुंबीयांनी भीतीपोटी कसलीही तक्रार केली नव्हती. गरोदर पिडीतेचा बाळांतपणात मृत्यू झाल्याने पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण आल्याने गुन्हा नोंद झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.