Yerawada : पुण्यातील येरवडा कारागृहात 26 लाखांहून अधिक रुपयांच्या मनी ऑर्डर फसवणुकीचा पर्दाफाश

एमपीसी न्युज : पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात 26 लाखांहून (Yerawada) अधिक रुपयांची फसवणूक उघडकीस आली असून, बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने दोन वर्षांपासून कारागृहातील मनीऑर्डर रजिस्टरमध्ये छेडछाड केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले आहे.

नारायणगाव पोलीस ठाण्यात 2006 मध्ये दाखल झालेल्या बलात्कार आणि खुनाच्या (Yerawada) प्रयत्नातील दोषी सचिन रघुनाथ फुलसुंदर याच्यावर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमान्वये फसवणूक, खोटारडेपना आदी आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. फुलसुंदर जन्मठेपेची शिक्षा भोगत असून तो 2006 पासून तुरुंगात आहे.

Pimpri : सर्दी, तापाचे रुग्ण वाढले, रुग्णालयांमध्ये गर्दी

 

तुरुंगाधिकारी बापूराव मोटे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी प्रथमदर्शनी माहिती दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत फुलसुंदर तुरुंगात बनवलेले पदार्थ बाहेर पाठवण्याच्या बहाण्याने अनेकदा कारागृहातील वर्कशॉपला भेट देत असे. त्याने तुरुंग अधिकाऱ्यांना फसवले आणि कारागृहातील मनी ऑर्डर रजिस्टरमध्ये प्रवेश मिळवला.

 

त्याने रजिस्टरमध्ये छेडछाड केली ज्यामध्ये कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी पाठवलेल्या मनी ऑर्डरच्या पैशांच्या खोट्या नोंदी आणि बनावट स्वाक्षऱ्या केल्या होत्या . फुलसुंदरने कथितरित्या रजिस्टरमधील मनीऑर्डरची रक्कम कमी केली, ज्यामुळे 26,69,911 रुपयांची फसवणूक झाली, ज्याचा त्याने स्वत:साठी वापर केल्याचा संशय आहे, असे पोलिसांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.