NCP : गणेश मंडळांच्या आरत्यांच्या निमित्ताने पवार काका-पुतण्यांचे शक्तीप्रदर्शन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार ( NCP) कुटुबियांनी पिंपरी-चिंचवड शहरावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरत्यांच्या निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. रोहित आज सायंकाळनंतर तर अजितदादा उद्या दिवसभर शहरातील मंडळांच्या आरत्या करणार आहेत.

बारामती खालोखाल पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा ( NCP) बालेकिल्ला मानला जातो. या शहरावर सलग 15 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. शहरातील राजकारणात अजितदादांची दादागिरी चालते. महापालिकेतील सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांचा गट प्रयत्नशील आहे. तर, मूळ राष्ट्रवादीच्या ताब्यात महापालिका आणण्यासाठी शरद पवार यांचा गट प्रयत्नशिल आहे. त्यासाठीच शरद पवार यांनी शहराची धुरा आपला नातू आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपविली आहे.

Chikhali : वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेला अटक

सोमवारी शहरात येवून दुचाकी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलेले आमदार रोहित पवार ( NCP) आज पुन्हा शहरात येत आहेत. सायंकाळी पाच नंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरत्या केल्या जाणार आहेत. त्याच्या माध्यमातून आपली ताकद आजमावत असल्याची चर्चा आहे.

तर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला बालेकिल्ला मजबूत करत पालिकेतील सत्ता पुन्हा खेचण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे उद्या रविवारी अजितदादा शहरातील सार्वजनिक मंडळांच्या आरत्या करणार आहेत. दिवसभर शहरातील 50 हून अधिक मंडळांना अजितदादा भेट देणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सावाच्या निमित्ताने पवार काका-पुतणे शक्तीप्रदर्शन करणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाते नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील आज पिंपरी-चिंचवड शहरात असणार आहेत. गणेश मंडळांना भेटी देणार ( NCP)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.