Indian Cricket Team : यंदा ट्वेंटी-ट्वेंटी, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारात भारतीय संघाची जगात अव्वल

एमपीसी न्यूज : जागतिक स्तरावर क्रिकेटचे (Indian Cricket Team) नियंत्रण करणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदेने (ICC) जागतिक क्रिकेट पुरुष संघांची क्रमवारी जाहिर केली आहे. त्यानुसार भारतीय पुरुष क्रिकेट संघ 20-20, वन डे आणि टेस्ट अशा तिन्ही फॉरमेटमध्ये सर्वाधिक गुणांसह प्रथम स्थानावर विराजमान झाला आहे.
20-20 क्रिकेट प्रकारात भारतीय पुरुष संघाने 264 गुण प्राप्त करत प्रथम स्थान काबीज केले आहे. त्यानंतर इंग्लंड 261 गुणांसह दुस-या स्थानावर आहे, तर पाकिस्तान 254 गुणांसह तिस-या स्थानावर आहे.
NCP : गणेश मंडळांच्या आरत्यांच्या निमित्ताने पवार काका-पुतण्यांचे शक्तीप्रदर्शन
एकदिवसीय क्रिकेट प्रकारात भारतीय पुरुष संघ 116 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. 115 गुणांसह दुसा-या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला मागे टाकून भारताने (Indian Cricket Team) हे स्थान काबीज केले आहे. तर ऑस्ट्रेलिया 111 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
जागतिक कसोटी क्रमवारीत भारताने याआधीच प्रथम स्थान प्राप्त केले असून त्याच्या नावावर 118 गुण आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर देखिल 118 गुण आहेत. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या नावे 115 गुण आहेत.