Nagpur : नागपुरात अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस

पावसामुळे लोक अडकले, शाळांना सुट्टी जाहीर

एमपीसी न्यूज –  नागपुरात काल रात्री झालेला पाऊस जनतेसाठी (Nagpur) त्रासदायक ठरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. बस डेपो आणि काही घरांमध्ये अनेक लोक अडकल्याचे वृत्त आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील मुसळधार पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

Indian Cricket Team : यंदा ट्वेंटी-ट्वेंटी, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारात भारतीय संघाची जगात अव्वल

नागपुरात रात्री 2 वाजल्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओसंडून वाहत असून जिल्हा व महानगर प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन पथक कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी आज सकाळी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहर व जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा व महानगर) जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आज (23 सप्टेंबर)  सुट्टी जाहीर केली आहे.

काही ठिकाणी अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रशासन सक्रिय

मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव काठोकाठ भरला आहे. (Nagpur)आजूबाजूच्या सखल भागांना याचा फटका बसला आहे. शहरातील इतर भागांनाही याचा फटका बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना काही ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी तातडीने अनेक पथके सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही तैनात करण्यात आली आहे.

नागपूरच्या पावसावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काल रात्री नागपुरात  अवघ्या 4 तासात 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले असून, तातडीने आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक टीम आणि एसडीआरएफची दोन टीम बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. आम्ही प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून (Nagpur) आहोत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.