Pimpri : सर्दी, तापाचे रुग्ण वाढले, रुग्णालयांमध्ये गर्दी

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात ( Pimpri) वातावरणामुळे साथीच्या आजारांसह संसर्गजन्य आजाराने चांगलेच डोकेवर काढले आहे. शहरात सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू हे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेची रूग्णालये, दवाखाने, खासगी रूग्णालये, क्‍लिनिकमध्ये रूग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. वातावरणात सातत्याने बदल होत आहे. या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दूषित हवा, पाणी, अन्नासोबत प्रदूषित परिसर यामुळे साथींच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील रुग्णालये, क्‍लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे.

Pune : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार

विषम हवामान तसेच दूषित पाण्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशा आजारांचे प्रमाण सध्या वाढले आहे. चिंतेची बाब म्हणजे यात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे लहान मुलांच्या दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. शक्‍यतो घरातील अन्नपदार्थ खाण्यास द्यावेत. पाणी उकळून पाजावे.

एकाचा आजार दुसऱ्याला होणार नाही, यासाठी संपर्क खंडित करावा. आजाराची लक्षणे जाणवताच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, आराम करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत. सध्याच्या वातावरणात नागरिकांनी स्वतःची प्रतिकार शक्ती उच्च प्रतीची कशा प्रकारे राहिल, यासाठी प्रयत्न करावेत. पुरेशी झोप, व्यायाम, ताजे अन्न, फळांचा आहारामध्ये समावेश करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत ( Pimpri) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.