Hinjawadi : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – विवाहाचे आमिष दाखवून शारीरिक व्यंग (Hinjawadi) असलेल्या तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच तरुणीकडून 10 लाख 43 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना फेब्रुवारी 2021 ते 1 जून 2023 या कालावधीत हिंजवडी आणि रावेत येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

स्वागत मोहन विनोदे (रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय पिडीत तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना जन्मजात शारीरिक व्यंग असल्याचे माहिती असताना आरोपीने फिर्यादीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

फिर्यादीने कोणास सांगू नये यासाठी त्यांना धमकावून व नंतर (Hinjawadi) विवाहाचे आमिष दाखवून पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने फिर्यादीकडून दहा लाख 43 हजार रुपये घेतले. फिर्यादीने दिलेले पैसे परत देण्याबाबत तसेच विवाहाबाबत विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Chakan : भरधाव वेगात वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.