Pune : राहुल गांधींच्या खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; पुण्यात पेढे वाटून कार्यकर्त्यांचा जल्लोष

एमपीसी न्यूज : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोदी या (Pune) आडनावाचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केल्याचं प्रकरण समोर आले होते. त्यावर गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी मानत दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने गुजरात न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने देशभरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पेढे वाटून जल्लोष केला. तर केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, भाजपची केंद्रात सत्ता येऊन 9 वर्षाचा कालावधी झाला आहे. या सरकाराच्या चुकीच्या धोरणा विरोधात भूमिका मांडल्यावर त्या व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

तर अनेकांना तुरुंगात देखील गेले आहे.त्यामुळे आपल्या देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या एकूणच परिस्थिती बाबत राहुल गांधी यांनी भूमिका मांडली होती.

तर त्यांना दोषी ठरविण्यात आले आणि खासदारकी गमवावी लागली होती. पण या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांच्या बाजूने निर्णय देत, केंद्र सरकारला चांगलेच सुनावले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांना देशभरात मिळत (Pune) असलेला प्रतिसाद आणि 2024 मध्ये भाजपला पराभव डोळ्या समोर दिसत आहे.यातून अशा प्रकारे विरोधकावर कारवाई केली जात आहे.अशा शब्दात भाजपवर त्यांनी टीका केली.

तसेच आम्ही केंद्र सरकाराच्या चुकीच्या धोरणा विरोधात याही पुढे आवाज उठवणार असून आमच्या विरोधात कितीही गुन्हे दाखल केले. तरी आम्ही मागे हटणार नाही. अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Akurdi : रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, मोहननगर परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त सकारात्मक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.