Pimpri : पिंपरी-दापोडी दरम्यानचे रेल्वे फाटक रविवारी दिवसभर बंद

Pimpri -dapodi railway crossing close On sunday Full Day : रविवारी सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत हे रेल्वे फाटक बंद राहणार आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी ते दापोडी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेले रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (दि. 26) दिवसभर बंद राहणार आहे.

रेल्वे विभागाच्या वतीने रेल्वे मार्ग, ओव्हरहेड वायरिंग आणि अन्य विविध प्रकारच्या दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली आहे.

रविवारी पिंपरी ते दापोडी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान   रेल्वे फाटकाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत हे रेल्वे फाटक बंद राहणार आहे.

या मार्गावरून प्रवास करणा-यांसाठी फाटकापासून 500 मीटरच्या अंतरावर कासारवाडी (जेआरडी टाटा) रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. त्या रस्त्याचा वाहन चालकांना वापर करता येईल, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.