Rajgurunagar : अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा : आमदार दिलीप मोहिते पाटील

Send proposal to Centerl to get Bharat Ratna for Anna Bhau Sathe: MLA Dilip Mohite Patil :महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न पुरस्काराची शिफारस होणे आवश्यक आहे.

एमपीसी न्यूज – लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ किताब मिळावा यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे.

2020 हे  अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान आणि कार्य पाहता महाराष्ट्र शासनाकडून त्यांना भारतरत्न पुरस्काराची शिफारस होणे आवश्यक आहे.

यासाठी विधानसभा आणि विधान परिषदे ठराव संमत होणे महत्त्वाचे असते.

मात्र, सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाने याबाबतचा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी खेड मतदार संघातून होत आहे.

या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करून केंद्राकडे पाठवावा, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात आमदार मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.