Pimpri :  राजन लाखे यांची साहित्य महामंडळावर निवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तिसरे प्रतिनिधी म्हणून कवी राजन लाखे यांची बहुमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही निवड जाहीर करून सदर निवडीचे पत्र राजन लाखे यांना सुपुर्द केले.

Chinchwad : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश

‘वास्तवरंग फुलताना’ , ‘मी पाहिलेला सूर्य’ , ‘सौंदर्याच्या गर्भातून’ , ‘मनातले माझ्या’ , ‘मन माझे मी मनाचा’ , ‘गुंता’ तसेच ‘ढब्बू ढेरपोट्या’ या बालसाहित्यासह त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित झालेली आहे. याशिवाय ‘बकुळगंध’ या विविध वैशिष्ट्ये असलेल्या, लाखे यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली नोंद ही विशेष सन्मानपूर्वक बाब आहे. लाखे यांच्या नियमबद्ध अन् कार्यक्षम पद्धतीमुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्याला प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या व्यासपीठावरील 1500 कवितांपैकी राजन लाखे यांनी संपादित केलेल्या निवडक 96 कवितांचा संग्रह डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी प्रकाशित करून कवींचा सन्मान केला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नेण्याची तसेच पिंपरी – चिंचवडला साहित्यनगरी म्हणून ओळख देण्याची मोलाची कामगिरी आणि आजवर साहित्य क्षेत्रात केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन राजन लाखे यांची सदरहू निवड झाली असून याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकीहाळ, पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, जे. जे. कुलकर्णी, शिरीष चिटणीस, ॲड. प्रमोद आडकर, रावसाहेब पवार आणि अन्य सदस्य उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.