Chinchwad : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील परवानाधारक ( Chinchwad) शस्त्र असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे 1400 पेक्षा अधिक शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. त्यांच्याकडे शस्त्रे पोलिसांच्या शस्त्रागारात जमा करण्यात येत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सरसावले आहेत. निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निवडणूक सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन केले जात आहे.

Bhosari : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यास प्रतिसाद

लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित होताच विशेष शाखेंतर्गत कार्यरत शस्त्र परवाना विभागातील पोलिसांची बैठक झाली. तातडीने परवानाधारकांसोबत संपर्क साधून शस्त्रे जमा करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शस्त्रे जमा करण्यात येत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सुमारे 1400 पेक्षा जास्त शस्त्र परवानाधारक आहेत. यामध्ये सेवानिवृत्त पोलिस, लष्करी अधिकारी-कर्मचारी, अति महत्त्वाच्या व्यक्‍ती, नामांकित व्यक्‍ती, राजकीय व्यक्‍ती, उद्योजक, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. त्यातील काही जणांना सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र बाळगण्यास सवलत ( Chinchwad)  मिळते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.